X Close
X
9819022904

बाईकस्वारांनी केला आमदार वारीस पठाण यांच्यावर हल्ला


MIM-MLA-Waris-Pathan

मुंबई : एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांच्याशी २ बाईकस्वारांनी टपोरी भाषेत शिवीगाळ केली. वारीस पठाण यांच्या अंगरक्षकांनी त्यांना शिव्या का देता म्हणून हटकले असता त्यांनी पठाण यांच्या गाडीला ठोकून पळण्याचा प्रयत्न केला. यात एकजण जखमी झाला. तर दुस-या पळणा-या बाईकस्वाराला अंगरक्षकांनी शिताफीने पकडून पोलिसांकडे स्वाधीन केले.

मी सुखरुप आहे. मी माझ्या घरी चाललो होतो, हे अचानक कसं झालं, काहीच समजलं नाही, अशी प्रतिक्रीया वारीस पठाण यांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत.

(PRAHAAR)