X Close
X
9819022904

पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मालवाहतुकीवर बंदी!


traffic-jam-at-western-expr

मुंबई: पश्चिम द्रुतगती मार्गावर सकाळी दक्षिण मुंबईकडे येताना आणि सायंकाळी दहिसरच्या दिशेने जाताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोडी होते. पश्चिम द्रुतगती मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत वांद्रे कलानगर ते दहिसर या मार्गावर माल वाहतूक करणा-या वाहनांना पश्चिम द्रुतगती मार्गावर बंदी घालण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

या नव्या नियमाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आहे. पुढील १५ दिवस हा प्रयोग करण्यात येईल आणि त्यानंतर परिस्थितीची आढावा घेतला जाईल, असे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी सांगितले. नव्या नियमाचा सकारात्मक परिणाम दिसल्यास दक्षिण मुंबईकडे जाणा-या रस्त्यावर सकाळच्या वेळेस या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती कुमार यांनी दिली.

(PRAHAAR)