X Close
X
9819022904

डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडून विराट कोहली पुन्हा अव्वल


viratkohli

क्रिकेट जगतातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा अनेक वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडित काढून विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

नवी दिल्ली- क्रिकेट जगतातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा अनेक वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडित काढून विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

नॉटिंगहॅम कसोटीत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या तिस-या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर विराटने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच कसोटी कर्णधार म्हणून सातवेळा २००हून अधिक धावा करून आपल्या संघाच्या विजयात हातभार लावण्याचा पराक्रमही विराटने केला आहे.

विराटने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार धावा केल्यानंतर त्याने अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर लॉर्ड्स येथील दुस-या कसोटी सामन्यात त्याला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला अव्वल स्थान गमवावे लागले होते. पण त्यानंतर तिस-या कसोटी सामन्यात मात्र त्याने दोन्ही डावांत धडाकेबाज फलंदाजी केली आणि त्यामुळे त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम विराटने मोडला

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एक मोठी कामगिरी केली असून क्रिकेट जगतातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा अनेक वर्षे अबाधित असलेला एक विक्रम त्याने मोडित काढला आहे. कसोटी कर्णधार म्हणून सातवेळा २००हून अधिक धावा करून आपल्या संघाच्या विजयात हातभार लावण्याचा पराक्रम विराटने केला आहे.

डॉन ब्रॅडमन व रिकी पाँटिंग या दोघांनीही कसोटी संघाचे नेतृत्व करताना सहावेळा २००हून अधिक धावा करण्याची कामगिरी केली होती. याआधी भारतीय कर्णधारांपैकी केवळ महेंद्रसिंग धोनी याला ही कामगिरी करता आली आहे. धोनीने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात चेन्नई येथे २२४ धावांची खेळी केली होती. कसोटी संघाचे नेतृत्व करताना विराटने तब्बल दहावेळा २००हून अधिक धावा केल्या आहेत. त्यापैकी सातवेळा संघाला विजय मिळाला आहे. हाही एक नवा विक्रमच आहे.

 

(PRAHAAR)