X Close
X
9819022904

कोहलीसह शास्त्री यांची बीसीसीआयतर्फे चौकशी होणार?


Kohli-and-Shastri

लॉर्ड्स कसोटीतील नामुष्कीजनक पराभवानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार रवी शास्त्री यांची चौकशी केली जाण्याची शक्यता बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिका-याने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- लॉर्ड्स कसोटीतील नामुष्कीजनक पराभवानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार रवी शास्त्री यांची चौकशी केली जाण्याची शक्यता बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिका-याने व्यक्त केली आहे.

‘‘इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, अशी तक्रार संघ व्यवस्थापन करू शकत नाही. दक्षिण आफ्रिका दौ-यातील कामगिरीनंतर व्यग्र वेळापत्रक आणि सराव सामन्यांच्या कमतरतेबाबत खेळाडूंनी तक्रार केली. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी झटपट सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्यामुळे संघ व्यवस्थापनाची तक्रार चुकीची आहे. शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने ऑस्ट्रेलिया (२०१४-१५मध्ये ०-२) आणि दक्षिण आफ्रिका (२०१७-१८मध्ये १-२) असा पराभव पाहिला होता,’’ असेही त्या पदाधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले.

भारताचा विद्यमान संघ पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी आहे. त्यामुळे शास्त्री यांच्यासह कोहली यांना खालावलेली कामगिरी उंचावण्याची शेवटची संधी आहे.

(PRAHAAR)