X Close
X
9819022904

कैद्यांनी बनविल्या दोन हजार गणेशमूर्ती!


Nashik-Jail-6G676T56

नाशिक कारागृहात गेली दोन वर्षे कैद्यांच्या मदतीने अत्यंत सुबक अशा शाडूच्या मातीचे गणपती तयार होत आहेत.

नाशिक- नाशिक कारागृहातल्या कैद्यांनी यावर्षी दोन हजार गणेशमूर्ती बनविल्या असून गेल्या वर्षीही अत्यंत सुबक अशा शाडूच्या मातीचे गणपती या कारागृहात तयार करण्यात आले.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मूर्ती बनवणारा सागर पवार एका गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत आहे. गणेश मूर्ती बनविण्याची कला सागरने तुरुंग अधीक्षकांना सांगितल्यानंतर अधीक्षकांनी त्याला गणेश मूर्तींचे साहित्य आणून दिले.

त्याच्या कल्पनेतून साकार झालेल्या या गणेशमूर्ती बनवण्याच्या कारखान्याला तुरुंग अधीक्षकांचेही मार्गदर्शन लाभले. यामुळे सागरने कारागृहातील अन्य सतरा कैद्यांनाही गणेशमूर्ती तयार करण्याचे काम शिकवले. आता गेली दोन वर्षे अन्य सतरा कैद्यांच्या मदतीने अत्यंत सुबक अशा शाडूच्या मातीचे गणपती या कारागृहात तयार होत आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी दोन हजार मूर्ती तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्णपणे हाताने बनवलेल्या आणि रंगविलेल्या मूर्तींना सागवानी आसन मोफत देण्यात येत आहे.

  ()