X Close
X
9819022904

कुर्ला स्टेशन परिसरात भिंत कोसळून ४ जखमी


kurla-wall-collapse

मुंबई : कुर्ला स्टेशन परिसरात आज सकाळी ९ वाजून ५० मिनिटाच्या सुमारास रेल्वेची सुरक्षा भिंत कोसळली. या दुर्घटनेत ४ जण जखमी झाले आहेत.

प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजुकडील हरियाना लेन मार्गावर राम महल हॉटेलजवळ ही भिंत कोसळली. दरम्यान कोणतीही वाहतूक कोंडी झालेली नसल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. जखमी झालेल्या सिराज (३०), लाखन खताल (२९), लक्ष्मण पाटील (४०) आणि अमिर कासिन (५८) या चार जणांना भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूनम यांनी सांगितले.

(PRAHAAR)