X Close
X
9819022904

कराटे : समीक्षा, ओमकार आणि विनीत यांना कांस्यपदक


karate

मुंबई – बालेवाडी (पुणे) येथे खेलो कराटे अखिल भारतीय कराटे स्पर्धेमध्ये एलफिन्स्टन कॉलेजच्या समीक्षा दीपक कायंदेकरसह ओमकार केंडे आणि विनीत साठे यांनी कांस्यपदक मिळवले.

ओकिनावा गोजू रियु कराटे डो इंडिया आयोजित स्पर्धेत समीक्षा,ओमकार आणि विनीत यांनी आपापल्या गटात उल्लेखनीय खेळ केला. तिघांनाही ‘वाको’ महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि प्रशिक्षक मंदार पनवेलकर आणि आणि प्रशांत गांगुर्डे याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

(PRAHAAR)