X Close
X
9819022904

आशियाई स्पर्धेत भारताचा पदकांचा षटकार


ASIAN-GAMES-MR9R534
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकासह एकूण सहा पदके जिंकली असून भारतीयांना आणखी एक सुवर्णसंधी आहे. जकार्ता- आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सहाव्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी आतापर्यंत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकासह एकूण सहा पदके जिंकली आहेत. तसेच जिम्नॅस्टिक्स बॅलन्स बीमप्रकारात दीपा कर्मकारचा अंतिम फेरीत सामना होणार असल्यामुळे भारतीयांना आणखी एक सुवर्णसंधी आहे. भारताने नौकानयन स्पर्धेत सांघिक क्वाडरपल स्कल्स प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. या संघात स्वर्ण सिंग, दत्तू भोकनळ, ओम प्रकाश आणि सुखतीम सिंह होते. तसेच रोहित कुमार आणि भगवान सिंह यांनी डबल्स स्कल्समध्ये तर, दुष्यंतने लाइटवेट सिंगल स्कल्समध्ये कांस्य पदक पटकावले. जपानच्या मियाउरा मायायुकी आणि ताएका मासाहिरो या जोडीने सुवर्ण तर कोरियाच्या किम बी आणि ली मिन्ह्युक यांनी रौप्य पदक पटकावले. भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि दिवीज शरण यांच्या जोडीने टेनिस दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. बोपन्ना आणि शरण यांनी अंतिम फेरीत कझागिस्तानच्या अलेक्झांडर बुबलिक आणि डेनिस येवसेव यांच्या जोडीला ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत सुवर्ण पदक जिंकले. नेमबाजीत भारताची अनुभवी नेमबाज हिना सिद्धूला महिला गटात १० मीटर एअर रायफल पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तर, भारतीय महिला कबड्डी संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत इराणने भारताचे आव्हान २७-२४ असे मोडीत काढत सुवर्ण पदक पटकावले. ()