X Close
X
9819022904

आघाडी सरकारच्या पापाची फळं आम्ही भोगत आहोत : राजकुमार बडोले


Mumbai:

प्रहार वेब टीम

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात अधिका-याला झालेल्या मारहाण प्रकरण चांगलेच गाजले.

याप्रकरणी आज स्वत: बडोले यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात काही गैरप्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल आणी जर कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

बडोले म्हणाले की अरुण निटुरे हे संस्थाचालक असून त्यांनी मान्यता न घेता आश्रमशाळा सुरु केली होती. आघाडी सरकारच्या कार्यकाळात ३२२ विना अनुदानित शाळा सुरु झाल्या ज्यांना मान्यता नाही. अशा अनधिकृत शाळा, औद्योगिक संस्था, अपंग कायम विना अनुदानित शाळांच्या मान्यतेसाठी अनेक लोक येतात. त्यामुळे आघाडी सरकारच्या पापाची फळं आम्ही भोगत आहोत.

अरुण निटोरे बाबत बोलताना बडोले म्हणाले की अरुण निटोरे यांची मानसिक तपासणी झाली पाहिजे. सरकार म्हणून जे करण्यासारखं आहे ते मी करतो. मी कोणालाही आमिष दाखवलं नाही. त्यामुळे त्यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत.