X Close
X
9819022904

अरुण नलावडे यांचे ‘तेरा दिवस प्रेमाचे’


arunnalawade

ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे हे ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाद्वारे पुन्हा रंगभूमीवर परतत आहेत. ‘प्रयोग फॅक्टरी’ निर्मित व ‘जिव्हाळा’ प्रकाशित या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले आहे. शिरीष राणे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. निर्मितीची बाजू अनुराधा सामंत यांनी सांभाळली आहे. म्हसवेकर यांचे हे २२वे नाटक आहे. ‘तेरा दिवस प्रेमाचे’ नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे गंभीर विषय त्यांनी विनोदी पद्धतीने मांडला आहे. म्हसवेकर यांनी या नाटकामध्ये मनोरंजन आणि गंभीर प्रवृत्ती याची अनोखी सांगड घातली आहे.

अरुण नलावडे यांच्यासह माधवी दाभोळकर, संजय क्षेमकल्याणी, शर्वरी गायकवाड, मेघना साने, देवेश काळे व संजय देशपांडे हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग सलग सहा दिवस रंगणार आहेत. १६ ऑगस्ट २०१८ रोजी रा. ८ वाजता शिवाजी मंदिर येथे ‘तेरा दिवस प्रेमाचे’ नाटकाचा शुभारंभ होईल. त्यानंतर सावित्रीबाई फुले नाटय़गृह (१७ ऑगस्ट), गडकरी रंगायतन (१८ ऑगस्ट), कालिदास नाटय़गृह (१९ ऑगस्ट), प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह (२० ऑगस्ट) आणि २१ ऑगस्ट रोजी पुन्हा शिवाजी मंदिर असे सलग सहा दिवस प्रयोग असतील.

(PRAHAAR)