X Close
X
9819022904

अभिजीत श्वेताचंद्र प्रथमच मुख्य भूमिकेत


abhijit-swetachandra

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘बाजी’ मालिकेद्वारे अभिनेता अभिजीत श्वेताचंद्र हा छोटय़ा पडद्यावर प्रथमच मुख्य भूमिका साकारत आहे. पेशवाईचा काळात घडणारी कथा असून, ३० जुलैपासून ही मालिका दररोज प्रसारित होत आहे.

मालिकेतील भूमिकेबाबत अभिजीत म्हणाला, ‘‘यापूर्वी, मी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे; परंतु ‘बाजी’ या मालिकेतून प्रमुख भूमिकेत पदार्पण करताना अर्थातच थोडे दडपण होते. ऐतिहासिक आणि शिवकालीन मालिका असल्याने लोकांना आमच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. मी साकारत असलेली ‘बाजी’ ही व्यक्तिरेखा म्हणजे शिवछत्रपती यांचा मावळा आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी तो जीवाची बाजी लावायला तयार आहे. या व्यक्तिरेखेसाठी मी मेहनत घेतली आहे. भूमिका अधिक चांगली वठण्यासाठी तलवारबाजी, घोडेस्वारी शिकावी लागली.’’

‘बाजी’ मालिकेद्वारे ‘झी मराठी’ वाहिनीने पुन्हा एकदा शंभर भागांचीच मर्यादित कथा प्रेक्षकांसाठी सादर केली आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’ नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे.

(PRAHAAR)