X Close
X
9819022904

अखरे एचडीएफसी बँकेच्या उपाध्यक्षांचा मृतदेह सापडला


HDFC-Bank-Vice-President-Siddharth-Sanghvi

मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह अखेर सापडला आहे. कल्याणमधील हाजीमलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून संघवी बेपत्ता होते. व्यावसायिक इर्षेपोटी संघवी यांची सहका-यांनी हत्या करवून आणली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मलबारहिल येथील रहिवासी असलेले संघवी हे कमला मिलमध्ये एचडीएफसी बँकेत कार्यरत होते. ५ सप्टेंबरला संघवी रात्री घरी परतलेच नाहीत. त्यांच्याशी काहीच संपर्क होत नसल्याने संपूर्ण कुटुंबि चिंतेत होते. ६ सप्टेंबरला त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केल्यावर कोपरखैरणच्या सेक्टर १९मध्ये संघवी यांची गाडी सापडली. गाडी रक्ताच्या डागांनी माखलेली होती, त्यात चाकूही सापडला. रविवारी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने सरफराज शेख या तरूणाला हत्येच्या संशयात ताब्यात घेतले. त्याने संघवी यांची हत्या केल्याची कबूली दिली. संघवी यांची वाढती प्रगती, त्यांना मिळालेली बढती, याचा राग एका सहका-याच्या मनात होता. त्यानेच इर्षेपोटी संघवी यांची हत्या घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

(PRAHAAR)