X Close
X
9819022904

अंधेरीत पुन्हा अग्नी तांडव


andheri-fire

मुंबई : अंधेरी एमआयडीसीत मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

अंधेरी एमआयडीसी सिप्झ गेट नंबर १, इमारत नंबर ५ मध्ये मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी आगीने रौद्ररुप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब आणि तीन पाण्याचे टँकर्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न सुरु होते. तब्बल ३ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आग लागण्यामागील नेमकं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

(PRAHAAR)