X Close
X
9819022904

अंधेरीतील मधु औद्योगिक परिसरात इमारतीला आग


fire-at-andheri

मुंबई : अंधेरी पूर्व येथील मधु औद्योगिक परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास एका इमारतीला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि ४ पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(PRAHAAR)